आज एकूण 46 झाडे घेतली. आधी Empress Garden मधून संभाजी काकांच्या मदतीने 13 झाडे घेतली. नागचाफा म्हणजे नेमका कुठला त्याचा निकाल लावला. नंतर ढोले काकांच्या नर्सरीमधून एकूण 33 झाडे आणली !! त्यातली बरीच तर श्री द महाजनांच्या पुस्तकातही नाहीएत !!
विशेष म्हणजे ही सगळी झाडे त्यांनी मोफत दिली !! कमाल आहे !!
त्या झाडांचा जामानिमा आणि त्यांची महाजनांच्या पुस्तकात मिळालेली माहिती.
Empress Garden मधून घेतलेली झाडे
कडूलिंब (1) मोह (1) किनई (2) शिरीष (2) रोहितक (2) कळम (2) टेमरू (2) भेरलीमाड (1)
ढोले काकांनी दिलेली झाडे
सोनचाफा (1) नाणा (2) पुत्रंजीव (2) भोकर (1) वावळ (1) कुंती (1) मेडशिंगी (1) वारस (1)
कांचनवेल (1) अग्नीमंथ (1) लकूच (1) कुंकुफळ (1) कोशिंब (1) धावडा (2) जंगली बदाम (1)
शमी (1) वड (2) दक्षिण मोह (2) अंजनी (1) समुद्रशोक (1) सोनचाफा (1) बीजा (1) उंडी (1)
डिकेमाळी (1) करमळ (1) टेटू (1)
किनई/किन्हई/पांढरा शिरीष.
म्हणजेच पांढरा शिरीष.
उंची 30 मीटरपेक्षा जास्त.
उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरूवातीला बहरतो.
एम्प्रेस गार्डनमधलं ते झाड म्हणजे किन्हईच !!
रोहितक
म्हणजेच इंग्रजीमधे सोहग.
उंची 8 ते 10 मीटर.
सोनचाफ्यासारखी पाने पण अधिक गडद पाने.
पावसाळ्यात फुलतो पण फुलल्याचे समजत नाही कारण फुले फारच बारकी असतात.
सदाहरित म्हणून ओळखल्या जातो.
कळम